क्‍या बोलती पब्लिक..!

देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. सत्ताधारी विरोधकांच्या या कलगीतुऱ्यामध्ये ‘चौकीदार ही चोर है’ हा विरोधकांचा आरोप तर त्याला ‘चौकीदार इमानदार है’ हे सत्ताधाऱ्यांचे उत्तर विशेष गाजताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांबाबत तरुणाईला काय वाटते याचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न…

मैं भी चौकीदार नवीन मोहीम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतली असून, हा एक बाण मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी सोडला आहे, या मोहिमेबाबत तरुणांमध्ये मोठया प्रमाणात चर्चा देखील आहे. हा बाण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती फायदेशीर ठरेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

– रोहित डुंबरे

मै.भी चौकीदार , 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली नवीन मोहीम, अत्यंत चांगली मोहीम असून मोदीजी आपले कर्तव्य इमानदारीने पार पाडत असल्याने देशातील नागरिक देखील या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. नागरिकांची साथ लाभलेली ही मोहिम या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला फायदेशीर ठरणार आहे.

– रेणुका पवार

सत्ताधाऱ्यांकडून नवीन कल्पना शोधून जोरदार जाहिरातबाजी करत देशातील समस्यांवरून लोकांचे लक्ष दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोण चौकीदार आणि कोण चोर त्याहीपेक्षा बेरोजगारांचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.एकमेकांवर चिखलफेक करून काहीही सध्या होणार नाही हे राजकारण्यांनी ओळखायला हवे मात्र सरकार कोणाचेही असो खेळ फक्‍त सत्ता आणि खुर्चीचा आहे ही सत्य परिस्थिती आहे.

– वैभव गाटे

मतदाराचे काम चौकीदार बनणे नसून, चौकीदार योग्य काम करतो का नाही, यावर लक्ष ठेवण्याचे असते. चौकीदार नका बनू, चौकीदार योग्य काम करतो की नाही, त्यावर लक्ष ठेवणारे बना. चौकीदाराने योग्य काम केले का नाही हे 23 मे लाच कळेल.

– आकाश उभे

सोशल मीडियावरती एखादे कॅम्पेन करून लोकांचे लक्ष विचलित होऊ शकते मात्र यामुळे जनतेचं प्रश्‍न सुटू शकत नाहीत, हे आता सर्वांना कळून चुकले आहे त्यामुळे अशा गोष्टींचा यावेळी भाजपला फायदा होईल असे वाटत नाही.

– अक्षय भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)