गोरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांनी त्यासाठी काय केले? : राहुल बजाज यांचा भाजपला अप्रत्यक्ष सवाल

मुंबई: गोरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांनी त्यासाठी काय केले, असा रोखठोक सवाल ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी मंगळवारी विचारला. त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

माझे आजोबा (जमनालाल बजाज) झोपडीत रहायचे. ते स्वत: गाई धुवायचे. मात्र, आज गायींसाठी जमावाकडून हत्या होण्याच्या घटना घडत आहेत. गोमातेबद्दल बोलणाऱ्या राजकीय पक्षांची नावे मी घेणार नाही. पण, त्या पक्षांच्या नेत्यांनी, त्या नेत्यांच्या जन्मदात्यांनी आणि त्यांच्या आजी-आजोबांनी गोमातेसाठी काय केले अशी विचारणा त्यांच्याकडे केली जायला हवी. त्यातील 95 टक्के जणांनी गोमातेसाठी काहीच केलेले नाही. जे करतात; ते बोलत नाहीत.

हाच राजकारणी आणि खऱ्या गांधीवादी कार्यकर्त्यामधील फरक आहे, असे बजाज म्हणाले. परखड मते मांडण्यासाठी ओळखले जाणारे बजाज त्यांच्या आजीच्या (जानकीदेवी बजाज) आत्मचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. केंद्रात आणि विविध राज्यांत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे स्थापन झाल्यापासून गोमांसाच्या व्यापारावरून जमावाकडून हत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर बजाज बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)