दोन वर्षानंतर ‘या’ खेळाडूचे वेस्ट इंडिजच्या संघात पुरागमन 

नवी दिल्ली – मधल्या फळीचा फलंदाज डेरेन ब्रावो याला दोन वर्षानंतर वेस्टइंडिजच्या एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजने बांगलादेश विरूध्दच्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी 15 सदस्यांचा संघ घोषित केला आहे.

डावखुरा फलंदाज ब्रावो याने 96 एकदिवसीय सामन्यापैकी अखेरचा सामना ऑक्टोबर 2016 मध्ये पाकिस्तानविरूध्द खेळला होता. डेरेन ब्रावो हा नुकत्याच झालेल्या भारताविरूध्दच्या टी20 मालिकेत वेस्टइंडिज संघात त्याचा समावेश होता. त्यानंतर त्याचे आता एकदिवसीय सामन्यात पुरागमन झाले आहे.

-Ads-

टी20 संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि रोस्टन चेज यांचीही रविवारपासून ढाका येथे होणाऱ्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे – रोवमन पॉवेल (कर्णधार), मार्लन सैमुअल्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, चंद्रपॉल हेमराज, शिमोन हेटमायर, डेरेन ब्रावो, शाई होप, कार्लोस ब्रैथवेट, कीमो पॉल, कीरेन पॉवेल, फैबियन एलन, केमार रोच, सुनील एम्ब्रिस, ओशैन थॉमस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)