मुंबई – वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास लाराच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#Mumbai: West Indies legend Brian Lara has been admitted to Global Hospital in Parel after he complained of chest pain. Hospital to issue a statement shortly. (file pic) pic.twitter.com/sGnvBpiavA
— ANI (@ANI) June 25, 2019
वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईत दाखल झाला आहे. स्टार स्पोर्टस वाहिनीवर सध्या तो क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम पाहतोय. याच दरम्यान त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याआधीही लाराला अशा प्रकारच्या वेदन झाल्या होत्या. तसेच सोम्य स्वरूपाचा हदय विकाराचा झटका देखील येऊन गेला होता.