मुंबईमध्ये ‘क्रिस गेल’ करत होता पार्टी; पोलीस पोहचले आणि….

अनेक विदेशी क्रिकेटर असे आहेत की, त्यांचे भारतातसुध्दा असंख्य चाहते आहेत. ‘एबी डिवलियर्स’ आणि ‘क्रिस गेल’ सारख्या दिग्गज क्रिकेटरांचा भारतात वेगळा चाहतावर्ग आहे. प्रत्येकाला त्यांची फलंदाजी पाहणे आवडते. ‘क्रिस गेल’ यालासुध्दा भारताबदल प्रंचड आवड आहे.

‘क्रिस गेल’ सध्या मुंबईमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान मुंबईतील एका पबमध्ये गेल हा पार्टी करण्यासाठी आला होता. तेथे त्यांनी खूप मस्ती केली. मात्र त्याचदरम्यान मुंबई पोलीस पार्टी रोखण्यासाठी तेथे पोहचले कारण खूपच रात्रीपर्यंत ही पार्टी चालू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘क्रिस गेल’ याने इंस्टाग्रामवर याबदलचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका फोटेमध्ये त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढला अाहे, तसेच सोबत लिहिले आहे की, भारतातील कायद्याचा मी आदर करतो. क्लबला लाॅक करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे अजून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गेल याने पोलिसाशी हात मिळवत लिहिले आहे की, कायद्याचा नेहमी विजय होतो. क्लबला पार्टीसाठी थोडी अजून वेळ मिळाली आहे.

क्रिस गेल याने त्यानंतर जोरदार पार्टी केली. त्यानंतर पुन्हा पोलीस कर्मचारीसोबत फोटो घेतले. त्याने पोलीसाच्या दुचाकी वाहनावर बसून सुध्दा फोटो घेतले. आणि हेच फोटो सोशल मिडीयावर सध्दा व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/BpVIz9zh79x/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)