विराट विरूद्ध स्वतंत्र रणनिती : स्टुअर्ट लॉ

पुणे – येथे आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार असून मालिकेत आता पर्यंत दोन सामन्यांमधिल पहिला सामना भारताने जिंकला आहे तर दुसरा सामना बरोबरीत सुटल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी असलेल्या भारतीय संघासमोर सामन्यात विजय मिळवून ही आघाडी 2-0 अशी वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, सरावाआधी बोलताना वेस्टइंडीचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ म्हणाले, ‘आमचा संघ जरी कमी अनुभवी असला तरी आमच्या खेळाडूलनी चांगला खेळ केला आहे. विशाखापट्टणममध्ये सामना बरोबरीत सोडविल्यानंतर खेळाडूंमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला असून, ड्रेसिंगरूममधील वातावरण बदलले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात चांगला खेळ करून मालिकेत बरोबरी साधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विराट चांगला खेळाडू असून तो खूप मेहनती आहे. त्याच्या विरूद्ध रणनिती आखून गोलंदाजी करणे गरजेचे आहे. पण त्याला धावा करण्यापासून रोखणे अवघड आहे. मार्वन सॅम्युएल्स अनुभवी खेळाडू असून, त्याच्या अनुभवाचा संघातील तरूण खेळाडूंना चांगला फायदा होत आहे. असे लॉ यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)