विंडीजकडे विश्‍वचषक जिंकण्याची पात्रता – ब्रेथवेट

कोलकाता – ख्रिस गेलच्या पुनरागमनाने वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा लयीत आला आहे. हे आपण इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाहिले आहे. असाच आमचा संघ लयीत राहिला तर आगामी विश्‍वचषक स्पर्धा जिंकण्याची पात्रता आमच्या संघात आहे असे विधान वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट केले आहे.

वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला तर एकदिवसीय मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधत प्रभावी कामगिरी नोंदवली. या विषयी बोलताना ब्रेथवेट म्हणाला की, वेस्ट इंडिज संघाने नजीकच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. याच कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती केल्यास आम्ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत. आम्हाला विश्‍वास आहे की, तिसरा विश्‍वचषक आम्ही जिंकू. खेळाडूंच्या नजरेने बोलायचे झाल्यास आम्हाला विश्‍वचषक जिंकण्याचा आम्हाला विश्‍वास आहे.

तसेच यावेळी आयपीएल विषयी बोलताना ब्रेथवेट म्हणाला की, आंद्रे रसेलच्या रूपात जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आमच्याकडे आहे. मी त्याच्याकडून खूप काही शिकतो, असे ब्रेथवेटने सांगितले. माझ्या छोट्या आयपीएल कारकिर्दीत कोलकाता नाईट रायडर्सने नेहमीच माझ्यावर बोली लावली त्यामुळे यंदा मी कोलकाताकडून खेळण्यास उत्सुक आहे.

“आमच्या संघाला प्रबळ दावेदार म्हणावे अशी माझी इच्छा नाही. मात्र, आम्ही चांगला खेळ केलेला आहे. या बळावरच विश्‍वचषक जिंकण्यासाठी आम्ही इंग्लंडमध्ये जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला कमकुवत समजू नका.
-कार्लोस ब्रेथवेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)