कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवासंपासून वैद्यकीय सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. या संबंधी स्थानीक वृत्तपत्राने एक फोटो प्रकाशीत केला असुन या फोटोत एक व्यक्ती आपल्या नवजात बाळाचा मृतदेह हातात घेऊन रडत असल्याचे दिसत आहे. फोटोग्राफर दमयंती दत्ता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटला हा फोटो शेअर केला आहे. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.
कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातली प्रत्येक शासकीय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी पुकारलेला संप आता देशभरात पसरला असून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि इतर राज्यांमधील रुग्णसेवेला त्याचा फटका बसताना दिसुन येतो आहे. शुक्रवारी कोलकातामधील फक्त दोन रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी सेवा सुरु होती. तर दिल्लीमधील एम्स रुग्णालयात रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यातच महाराष्ट्रातील 4500 डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातही अनेक ठिकाणी आरोग्यसेवेला याचा फटका बसला आहे.
Between #Savethedoctors and #SaveBengal, here is a father who lost his newborn because doctors wouldn’t treat the baby. Today's @MyAnandaBazar pix. pic.twitter.com/xyGsZi92GS
— Damayanti Datta (@DattaDamayanti) June 14, 2019