सत्तेसाठी ममतांचा पाठिंबा घेणार नाही : कॉंग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर केंद्रात सत्ता स्थापण्यासाठी कॉंग्रेस पक्ष ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन मागणार नाही, असे वक्‍तव्य पश्‍चिम बंगाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांनी केले आहे.  ममता बॅनर्जी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या पाठीराख्या असल्याचा आरोपही मित्रा यांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस संघाची मदत घेत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहरामपुरच्या एका सभेत केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)