दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुंडीमध्ये पूल कोसळला  

नवी दिल्ली – पश्चिम बंगलामध्ये गेल्या चार दिवसाच्या आत पूल कोसळण्याची दूसरी घटना घडल्याचे समोर येत आहे. राज्यात दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुंडीजवळ शुक्रवारी सकाळी एक पूल कोसळला आहे. एक ट्रक या पूलावरून जात असताना अचानक ही घटना घडली.

ट्रक चालक या घटनेत जखमी झाला आहे. घटनेनंतर तुटलेल्या पूलावर ट्रक पुर्णपणे लटकला गेला. राज्याचे मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी सांगितले की, ‘ट्रक पूलावरून जात असताना अचानकपणे पूल कोसळला, त्यामुळे ट्रक पूलावर अडकला. हा पूल मानगंज आणि  सिलीगुंडी गावाला जोडणारा हा पूल आहे. ट्रक चालकाला उपचारासाठी रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे’.

आठवड्याभरातील पूल कोसळण्याची ही दूसरी घटना आहे. याआधी 4 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील माझेरहाट भागात पुल कोसळला होता. या घटनेत एक जण मृत्यूमुखी तर 19 लोक जखमी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)