विडणीत कृषिदूतांचे उत्साहात स्वागत

विडणी- विडणी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी जि. अहमदनगर संलग्न कृषी विद्यालय बारामती येथील कृषिदूत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी विडणीत आलेल्या कृषीदूतांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी कृषिदूतांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करण्यासाठी प्रेरित करून स्वतः शिका व शिकवा असा सल्ला श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिला. कार्यक्रमास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोसले, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, संजय अभंग, राजेंद्र शिर्के, राजीव पवार, विठ्ठल जगताप तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमात कृषिदूतांच्यामार्फत प्रामुख्याने आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिक सल्ला, संबंधित प्रात्यक्षिके व इतर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये ऋषीकेश बेलदार, विवेक दळवे, निखिल देवकाते, शिवराज कुंभार, मयुर माने, शुभम नाझीरकर, केदारनाथ चिन्नी, हृतिक बाल्ले हे कृषिदूत विडणी व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here