राहुल गांधींच्या शबरीमला प्रकरणातील वक्तव्याचे केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

थिरूवनंतपुरम – शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जी प्रतिक्रीया दिली आहे त्याचे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी स्वागत केले आहे. या संबंधात प्रतिक्रीया देताना राहुल गांधी काल इंदौर मध्ये म्हटले होते की महिलांना त्या मंदिरात प्रवेश दिला जावा असे माझे व्यक्तीगत मत आहे. तथापी या विषयी माझे आणि कॉंग्रेस पक्षाच्या केरळ शाखेची मते भिन्न आहेत.

महिलांना त्या मंदिरात प्रवेशाला बंदीच असली पाहिजे अशी लोकभावना आहे आणि तेथील काही महिला संघटनांचीही तीच मागणी आहे. कॉंग्रेसच्या केरळ प्रदेश शाखेने लोकमताशी सहमती दर्शवत शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे तथापि त्याविषयी माझ्या स्वताचे मत मात्र भिन्न आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

राहुल गांधी यांनी प्रांजळ भूमिका व्यक्त केली असून त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करतो असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे. तथापी विजयन यांनी केरळ प्रदेश कॉंग्रेसच्या या विषयावरील भुमिकेवर मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की केरळ प्रदेश कॉंग्रेसची भूमिका परंपरावादी आहे आणि घटनेतील तत्वाला ती धरून नाही. केरळ प्रदेश कॉंग्रेसने आपले पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भूमिकेपासून काही बोध घ्यावा असेही त्यांनी सूचवले आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी फेसबुक पोस्टवर ही भूमिका मांडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)