वसंतदादांच्या घराण्याचे भाजपमध्ये स्वागत करू – चंद्रकांत पाटील

संग्रहित छायाचित्र

सांगली – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे, त्यांचे स्वागत करू असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. प्रतिक पाटील आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी भाजप मध्ये यावे, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

काँग्रेसने वसंतदादांच्या घराण्याची वाट लावली. त्यामुळे काँग्रेसने तुम्हाला योग्य तो सन्मान न दिल्यास भाजप मध्ये या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. “काँग्रेसने तिकीट दिले तर तुम्ही ही निवडणूक हरणार आहात आणि जर तुम्हाला तिकीट नाही दिले तर स्वाभिमानाने बाहेर पडा. आम्ही तुमचे स्वागत करू.” असे चंद्रकांत पाटील यांनी प्रतीक पाटील यांना उद्देशून म्हंटले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाराज झालेले प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. सांगली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रतीक पाटील यांनी ही घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)