जैन साधू-साध्वी यांचे राहात्यात स्वागत

शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

राहाता: राहाता शहरात आजपासून सुरू होत असलेल्या आत्मध्यान साधना शिबिर होत आहे. या शिबिरात जैनाचार्य शिवमुनी महाराजांसह एकूण 36 संत व साधूंचे शनिवारी राहाता शहरात आगमण झाले. त्यांचा राहाता शहर जैन श्रावक संघ, आनंद जैन पाठशाळा व समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

आचार्य शिवमुनीजी महाराज व त्यांच्या समवेत आलेल्या 14 संत व 22 साध्वींचे शहारात उत्साहात स्वागत करण्यात आले. संत व साध्वींच्या स्वागतासाठी शहरात ठीकठिकाणी शोभेच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. आनंद जैन पाठशाळेच्या सुनीताताई बागरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आचार्य शिवमुनीजी महाराजांसह साध्वी व संतांचे स्वागत केले. सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साकुरी हद्दीत आगमन होताच संपूर्ण समाज बांधवांनी मोठा आनंदोत्सव साजरा करत व संतांचे दर्शन घेतले. प्रफुल्ल दयाराम पिपाडा यांनी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी नवकारशी ग्रहण केली. त्यानंतर जैन स्थानकात शिवमुनीजी महाराजांनी उपस्थितांना उपदेश दिला दरम्यानच्या काळात दुपारी अडीच वाजेनंतर तीन तासांचे बाल संस्कार शिबिर संपन्न झाले.

आचार्य म्हणाले, धर्माचे ध्यान केले पाहिजे. त्याचप्रमाणे अनाथ गरजू आणि असह्य असलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे खरी मानवता आहे. मानवता आणि माणुसकी सर्वांत मोठा धर्म आहे. परमेश्‍वराने आपल्याला इतरांच्या चेहऱ्यावर हास्यनिर्माण करण्याकरता मानवाचा जन्म दिला आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे आपल्या प्रत्येकाच प्रथम आद्य कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. संस्काराने जीवन महान बनू शकते म्हणून जीवनात संस्कार अतिशय महत्त्वाचा असल्याचे यावेळी आचार्य शिवमुनीजी यांनी सांगितले. या संस्कार शिबिरात शंभर बालकांनी सहभाग नोंदवला.

आजपासून आत्मज्ञानी आचार्य महाराज यांचे तीन दिवसीय आत्मज्ञान साधना शिबीर राहाता येथील साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन जैन श्रावक संघाचे संघपती खुशालचंदजी रायसोनी व समाज बांधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)