मोदींनी इम्रान खान यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे चीनकडून स्वागत

बिजींग: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमीत्त एक शुभेच्छा संदेश पाठवला होता. त्याची जाहीर वाच्यता करण्याचे मोदी सरकारने टाळले असले तरी त्याची माहिती आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहचली असून चीनने मोदींनी पाकिस्तानला पाठवलेल्या संदेशाचे स्वागत केले आहे.

मोदींनी पाकिस्तानला हा गुपचुप संदेश का पाठवला असा सवाल उपस्थित केला जात असून कॉंग्रेस पक्षाने त्यांना पाकिस्तान को लव्ह लेटर लिखना बंद करो या भाषेत टोमणा मारला होता. हेच विधान मोदींनी कॉंग्रेसच्या बाबतीत केले होते. पण मोदींनी पाकिस्तानला जो संदेश पाठवला त्याची अधिकृत माहिती स्वता इम्रान खान यांनीच उघड केली. त्यावर प्रतिक्रीया देताना चीनने म्हटले आहे की पाकच्या राष्ट्रीय दिनानिमीत्त दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवल्याने त्यातून दोन्ही देशांमध्ये सौर्हादाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे त्यामुळे या प्रक्रियेचे आम्ही स्वागत करतो. भारत आणि पाकिस्तान या देशांनी एकमेकांशी संवाद साधून आपसातील मतभेद मिटवावेत आणि एकमेकांमधील संबंध स्थीर ठेवावेत अशी अपेक्षाही चीनने व्यक्‍त केली आहे. चर्चेद्वारे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला चीनही मदत करील असेही चीनने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)