ममतांनी केले सपा-बसपा आघाडीचे स्वागत

कोलकाता: उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या आघाडीचे तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्वागत केले आहे. ही आघाडी उत्तर भारतातातून भाजपला उखडून टाकेल असे त्या म्हणाल्या. ही एक चांगली राजकीय घडामोड आहे असेही त्यांनी नमूद केले.

ममता बॅनर्जी या स्वत: भाजपच्या कट्टर विरोधक असून त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी कोलकात्यात याच महिन्यात एका रॅलीचे आयोजन केले आहे. त्यांच्या आघाडीत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष हे दिसणार नसले तरी ममतांनी त्यांच्यातील आघाडीचे स्वागत केले आहे. भाजपला सत्तेवरून घालवण्यासाठी उत्तरप्रदेशातील या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते अशी त्यांची धारणा होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)