अतिरेकी विरोधी कारवाईचे हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत

कराड – पुलवामा येथील अतिरेकी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या तळावर थेट हल्ला करुन तळच उध्वस्त केला. यामुळे संपूर्ण देशभरात या कारवाईचे स्वागत केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे. कराड शहरात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्‍याची आतषबाजी करीत अभिनंदनाचे फलक लावले. तर काही ठिकाणी नागरीकांनी जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला.

दि. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर अतिरेकी संघटनेने आत्मघातकी बॉम्ब हल्ला करुन 44 निष्पाप सैनिकांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर देशभर तीव्र संतापाची लाट उसळली. पाकच्या आश्रयामुळे या अतिरेकी संघटनांचे फावले असल्यामुळे पाक विरोधातच भारताने आक्रमक पाऊल उचलावे, अशी मागणी तमाम भारतीय जनतेतून व्यक्त केली जात होती. त्यानंतर भारत सरकारने पाकची अनेक मार्गाने कोंडी करण्यास सुरुवात केली. पाकच्या राष्ट्रीय ध्वजाची, तसेच पाक व पाकचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ, बंद आदी माध्यमातून नागरिकांनी संताप व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने यापूर्वीही झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करत सीमावर्ती भागातील अतिरेक्‍यांचे तळ उद्‌ध्वस्त केले होते. तशाच पद्धतीने मंगळवारी पहाटे भारतीय लष्कराच्या हवाईदलाने बॉम्बचा वर्षाव करत पाकमधील जैश-महंमदचा तळ उद्‌ध्वस्त केला. यात अडीचशे ते तीनशे अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यात हवाई दलास यश आले. या कारवाईमुळे भारतीय नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत लष्करी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. कभ्याड पाकिस्तानवर हिंदूस्थानचा हल्ला, जैशे मोहम्मदचा खातमा 250 ठार, बालाकोट, चाकोटी, मुझफराबाद उद्‌ध्वस्त, नका लागू नादी नाव माझे मोदी, 56 इंच असा मजकूर या फलकावर लिहला होता. भाजपाचा झेंडाही फडकविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)