भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर  – राज्यात दिवाळीत बंद झालेले भारनियमन दिवाळीनंतर पुन्हा सुरु होणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यातील वीजेची मागणी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

राज्याच्या वीजपुरवठ्यासाठी असलेल्या कोळशाचे योग्य नियोजन केले आहे. शिवाय सध्या थंडीच्या दिवसांमुळे वीजेची मागणी कमी आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही भारनियमन होणार नसल्याचे बावनकुळे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. सध्या राज्यातील वीजेची मागणी कमी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत विजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्या पुढे गेली होती. ऑक्‍टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती.

-Ads-

वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्‍य नव्हते, म्हणून लोडशेडिंग सुरू करण्यात आली होती, असे बावनकुळे म्हणाले. मात्र तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. विजेची मागणी कमी झाली असून ती 20 हजार मेगावॅटवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये यासाठी 25 हजार मेगावॅटपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे. त्याचा फायदा वीज निर्मितीसाठी होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांची 32 हजार कोटींहून अधिकची वीज बिल थकबाकी आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे. मात्र तरीही शक्‍य झाल्यास किमान वीज बिल भरून शेतकऱ्यांनी सरकारला मदत करावी, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)