साप्ताहिक राशी-भविष्य

लक्ष्मी, मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरू, भाग्यात शुक्र, शनी, प्लुटो दशमात केतू, रवि, लाभात बुध, नेप्च्यून आहे. ग्रहमान तुम्हाला सजग दृष्टीकोन ठेवायला भाग पाडेल. तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. कामात कर्तव्यात दक्ष राहाल, खर्च वाढला तरी चांगल्या कामासाठी असेल. त्यामुळे समाधान मिळेल. 

खर्चाचे प्रमाण वाढेल 

घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात तुमची निर्भयी वृत्ती व धाडसी प्रवृत्तीची चुणूक दिसेल. कर्तव्यात कसूर न करता कामात प्रगती कराल. नोकरीत इतरांनी केलेला विरोध सहन होणार नाही. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तेष्ट प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना स्वतःच्या तंत्राने वागण्यात आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15,16,17. 

प्रवास घडेल 

कामात रस घेऊन सक्रिय बनाल. व्यवसायात आलेली शिथिलता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न राहतील. पैशाची आवक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काम स्वीकाराल. हाती घ्याल. नोकरीत कामे वेळेत पूर्ण करण्याचा मनोदय राहील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. मुलांच्या प्रगतीबाबत सुवार्ता कळेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
शुभ दिनांक : 13,14,15,16,17. 

परदेशी कामांना गती 

तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला होईल. त्यामुळे कामात विशेष लक्ष द्याल व यश प्राप्ती कराल. वातावरण व सभोवतालच्या व्यक्तींची साथ तुम्हाला मिळेल. व्यवसायात कामाची व्याप्ती वाढेल. आर्थिक चणचण दूर होईल. नोकरीत तुमच्या गुणांची कदर होईल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत व महत्व कळेल. तुमच्या वागण्या बोलण्याने वातावरण आनंदी राहील.
शुभ दिनांक : 11,12,16,17. 

प्रियजनांच्या भेटीगाठी 

कार्यमग्न राहून कामे उरकाल. व्यवसायात चाकोरीबाहेर जाऊन कामं कराल, त्यामुळे तुमचे महत्व वाढेल. बाजारातील चढउतारांकडे विशेष लक्ष राहील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड करतील. घरात वातावरण आनंदी राहील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15 

मोठ्या योजना दृष्टीक्षेपात 

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची प्रचिती येईल. व्यवसायात मोठ्या योजना दृष्टीक्षेपात येतील. परंतु त्या हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा व त्रुटींचा अभ्यास करावा. महत्वाची कामे स्वतः करावीत. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही मिळतील. मात्र त्याचा गैरवापर करु नका. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे होतील. महिलांना जादा धावपळ दगदग करावी लागेल.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15,16,17. 

पेल्यातील वादविवाद 

आर्थिक विवंचना कमी होऊन कामांना वेग येईल. व्यवसायात प्रगतीकारक संधी येतील योग्य वेळी योग्य व्यक्तींची झालेली मदत बरेच काही मिळवून देईल. सरकारी कामात यश येईल. नोकरीत रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आलेल्या संधीचा जास्तीत-जास्त फायदा घ्या. घरात नको त्या कामांत वेळ गेल्यामुळे इतर कामांना विलंब होईल. चांगली बातमी मन प्रसन्न करेल. तब्येत सांभाळून कृती करा.
शुभ दिनांक : 13,14,15,16,17. 

नवीन कामे मिळतील 

पैशाची स्थिती समाधान देणारी असल्याने चिंता मिटेल. देणी देता आल्याने भविष्यातील स्वप्ने रंगविता येतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. सहकारी व वरिष्ठ महत्वाचे निर्णय घेतांना तुमचा सल्ला घेतील. बोलण्यातून इतरांची मने दुखावणार नाहीत यांची काळजी घ्या. घरात रखडलेल्या प्रश्‍नांवर तोडगा निघेल. नातेवाईक आप्तेष्ट यांचे भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मूड राहील.
शुभ दिनांक : 11,12,16,17. 

प्रयत्नांना यश मिळेल 

मनी वसे ते स्वप्नी दिसेल ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात मनातील सुप्त इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळेल.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना यश येईल. जुनी येणी वसूल झाल्याने आनंद होईल. नोकरीत सहकारी कामात मदत करतील. नोकरी निमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वातावरण आनंदी राहील. स्वास्थ्य मिळेल. मुलांच्या प्रगतीबाबत सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 13,14,15. 

कामांना गती 

घरातील कामे वेळेत पूर्ण करून मगच इतर कामांकडे लक्ष द्यायचे असे तुमचे इप्सित असेल. ते साध्य होईल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. भांडवलाची तरतूद करून कामांना गती द्याल. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेले काम आनंदाने करा यश येईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. विचारांपेक्षा कृतीवर भर द्या. महिलांनी विनाकारण चिंता करू नये.
शुभ दिनांक : 11,12,16,17. 

सबुरी ठेवा 

सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव घ्याल. गोंधळाची स्थिती असेल. तर थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात कामाची उमेद चांगली असेल. व्यवहारी निर्णय घ्या नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. तरीही वाच्यता करू नका. महत्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. डोळे शांत ठेवा. महिलांनी सर्वांशी जमवून घेणेच इष्ट. तरूणांना एक नवी दिशा मिळेल. लाभ घ्या.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15. 

योग्य सल्ला घ्या 

आपलाच घोडा दामटवण्यापेक्षा, प्रकृती व आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन पुढे जा. व्यवसायात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य सल्ला घ्या. नोकरीत तुमच्या कामाला महत्व आल्याने वरिष्ठांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा असतील. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. घरात मानसिक समाधान ठेवण्यासाठी तोंडाला कुलूप ठेवा.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15,16,17. 

नवीन कामे मिळतील 

कल्पना व विचार यांचा योग्य समन्वय साधल्यामुळे तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षा साकार होतील. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. आर्थिक उब लाभल्याने मनात वेगळे तरंग उठतील. नवीन कामे हितचिंतकांची मदत घेऊन मिळतील. वरिष्ठांच्या पुढे-पुढे करून जादाची कामे ओढवून घेऊ नका. घरात तुमच्या कामाला मान मिळेल. महिलांची मनाजोगती कामे पार पडतील. खरेदीचा मनमुराद आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 11,12,13,14,15,16,17. 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)