साप्ताहिक राशी-भविष्य : 4 ते 10 मार्च 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत मंगळ व हर्षल, कर्केत राहू, वृश्‍चिकेत गुरु, धनुमध्ये शनी व प्लुटो, मकरेत शुक्र व केतू, कुंभेत रवी व नेप्च्यून तर मीनेत बुध आहे. जो 6 मार्चला वक्री होत आहे.
वरील ग्रहमान तुम्हाला सतत कार्यमग्न ठेवणारे आहे. तरी कोणतेही निर्णय घेताना थोडी सबुरी ठेवा. पैशाची स्थिती समाधानकारक देणारी असेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.

विसंबून राहू नका

“रात्र थोडी सोंग फार’ अशी स्थिती तुमची असेल तेव्हा थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात अनुकुल घटना उत्साह वाढवतील. पैशाची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. वेळेचे बंधन ठेवून कामाचा उरक ठेवा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग येतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. मुलांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 10.


ग्रहांची साथ राहील

नोकरी, व्यवसाय, घर या सर्व ठिकाणी सारखेच लक्ष द्यावे लागेल. ग्रहांची साथ राहील. व्यवसायात नवीन कामाची संधी मिळेल. हितचिंतकांची मदत मिळेल. महत्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. नोकरीत नेहमीपेक्षा वेगळे काम कराल. जादा अधिकारही मिळतील. घरात वातावरण आनंदी राहील. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 7, 8, 9.कर्तव्य श्रेष्ठ

सभोवतालच्या वातावरणानुसार स्वत:मध्ये बदल केलात व लवचिक धोरण ठेवलेत तर लाभ होईल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. भविष्यात फायदा मिळवून देतील अशा कामांवर लक्ष केंद्रित कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. घरात नवीन खरेदीचा मोह होईल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामात मदत कराल.

शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9, 10.


खर्चाचे प्रमाण वाढेल

विरोधकांवर मात करून कामात प्रगती करायची हे तुमचे उद्दीष्ट राहील. व्यवसायात सतर्क राहून कामातील डावपेच आखा. कृतीवर भर देऊन व कामाची योग्य आखणी करून कामे संपवा. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागली तरी रागावू नका. वरिष्ठांच्या सूचनेचे पालन काटेकोरपणे करा. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल त्यामुळे पैसे शिल्लक राहणार नाहीत.

शुभ दिनांक : 4, 8, 9, 10.वातावरण आनंदी

मनोबल चांगले राहील. मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा सफल होतील. व्यवसायात कामाचा विस्तार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नवीन योजना, प्रकल्प तुम्हाला आकर्षित करतील. उलाढाल वाढेल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. नोकरीत तुमचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. वातावरण आनंदी राहील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

शुभ दिनांक : 5, 6, 7, 10


नवीन संधी

परिस्थितीनुरुप ध्येय धोरण ठेवावे. व्यवसायात व्यवहारदक्ष राहून कामात प्रगती साधता येईल. कामाचा वेग वाढेल. त्यामुळे क्षणभरही विश्रांती मिळणार नाही. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नवीन हितसंबंध जोपासले जातील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांना तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. नवीन संधी तुम्हाला आकर्षित करेल. पैशाची चिंता मिटेल. प्रवासाचे बेत निश्‍चीत होतील.

शुभ दिनांक : 4, 8, 9.


सुवार्ता कळेल

ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचे बेत सफल होतील. ओळखीचा उपयोग होऊन खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. पैशाची आवकही वाढेल. नवीन कामाची सुरुवात कराल. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. मात्र कामातील बेत गुप्त ठेवा. जादा सवलती व सुविधांचा लाभ मिळेल. मुलांच्या व इतर व्यक्‍तींच्या सुखसमाधानासाठी चार पैसे जादा खर्च होतील.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 7, 10.


सावध राहा

माणसांची पारख करून त्यांचा योग्य तो उपयोग करून घेण्यात तुमच्या बुद्धीकौशल्याची चुणूक दिसेल. व्यवसायात काही गोष्टी जरी मनाविरुद्ध घडल्या तरी डोके शांत ठेवा. येणाऱ्या संधीची वाट पहा. महत्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मतलबापुरते गोड बोलतील तरी सावध राहा. घरात अचानक उद्‌भवणाऱ्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागेल.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 7, 8, 9.


चांगली बातमी कळेल

बुद्धीकौशल्य व चातुर्य यांना कल्पकतेची जोड मिळाल्याने कामे वेगात होतील. एका नवीन पर्वाची ही नांदीच असेल तेव्हा कंबर कसून कामाला लागा. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवाल. कधी शक्‍ती तर कधी युक्‍तीने कामाचा उरक पाडाल. पैशाची तरतूद करावी लागेल. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. धार्मिक कार्यक्रम होतील.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 7, 8,9.


मानसिक शांतता

स्वयंसिद्ध राहून कामे करा. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून कामांना गती द्या. कामामुळे तुमची दगदग धावपळ वाढेल. नवीन योजना हाती घेऊन त्यात प्रगती करण्याचे तुमचे इप्सित साध्य होईल. नोकरीत “ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असा खाक्‍या राहील. तुमचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवा. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. मानसिक शांतता मिळेल.

शुभ दिनांक : 4, 5, 6, 7, 8, 9, 10.


जुनी येणी वसूल होतील

“केल्याने होत आहे रे’ हे लक्षात ठेवा. सभोवतालच्या व्यक्‍तींचा खट्टा मीठा अनुभव येईल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करुन उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. महत्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. मुलांकडून मानसिक समाधान मिळेल.

शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9, 10.


प्रवास घडेल

नाचरेपणा नको. व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्‍तींची मदत घ्या. युक्‍तीने कमी श्रमात जास्त यश मिळेल. व्यवसायात नवनवीन कल्पनांचा वापर करून विक्री व उलाढाल वाढवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत मनाजोगती कामे करता येतील. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. प्रवास घडेल. प्रियजनांच्या समवेत वेळ मजेत जाईल. प्रकृतीमान सुधारेल.

शुभ दिनांक : 4, 8, 9, 10.


 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)