साप्ताहिक राशी-भविष्य : 8 ते 14 एप्रिल 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी हर्षल धनस्थानात मंगळ, तृतीयेत राहू, भाग्यात शनी, केतू, गुरु वक्री व प्लुटो, लाभात शुक्र, नेप्च्यून तर व्ययात रवी व बुध येत आहे. वरील ग्रहमान तुमची सजगता वाढवेल. कामाचे योग्य नियोजन करून कामे हातावेगळी करा. स्वत:ची कुवत ओळखून पावले उचला. पैशाची सोय होईल. प्रियजन, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.

प्रवास घडेल
शुक्राची साथ मिळेल. तुमचा कामाचा वेग वाढेल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. अपेक्षित पैसे हाती येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत दिलेले काम करा. स्वत:च्या अपेक्षा थोडा काळ बाजूला ठेवाव्या लागतील. कामानिमित्त प्रवास घडेल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सतसंगाचा महिलांना लाभ होईल. मानसिक आरोग्य सुधारेल.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 11, 12, 13.

 


आवक जावक समान

कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. पण कर्तव्यात कोठेही कसूर होणार नाही याची दक्षता घ्याल. व्यवसायात मनाजोगते पैसे मिळतील. त्यामुळे शिल्लक राहणार नाही. गरजा वाढल्याने नवीन जोडधंदा सुरु करावासा वाटेल. नोकरीत फायदा ज्यात असेल तेच काम हाती घ्याल. गोड बोलून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल.घरासाठी नवीन खरेदीचा मोह होईल. प्रकृतीमान नाजूक राहील.
शुभ दिनांक : 9,10, 11, 12, 13.

 


घरात शुभकार्य
कामाचा तणाव कमी झाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात अपेक्षित कामात प्रगती होईल. जुनी देणी देता येतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीत कार्यपद्धतीत बदल घडवून कामे हातावेगळी कराल. वरिष्ठांनी दिलेल्या सवलतींचा लाभ घ्या. कमी श्रमात कामाचा उरक पाडाल. घरात शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. जुने प्रश्‍न धसास लागतील.
शुभ दिनांक : 8, 11, 12, 13, 14.


वरकमाई होईल
मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतील. ग्रहांची मर्जी आहेच. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. त्यामुळे नवीन योजना हाती घ्याल. अपेक्षित प्रतिसाद इतरांकडून मिळेल. आनंद वाटेल, नोकरीत मनाजोगते काम मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई चांगली होईल. घरात गृहसजावट दुरुस्ती व वाहन खरेदीचे योग येतील. विवाहाचे योग येतील.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 13, 14.


प्रगतीकडे वाटचाल
विरोधकांवर मात करून प्रगतीची वाटचाल कराल. व्यवसायात आवश्‍यक त्यावेळी सबुरीचे धोरण ठेवलेत तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात भावनिक निर्णय घेऊ नका. सतर्क राहून स्पर्धेतील खबरबात घ्या. मतलबापुरते सहकारी व वरिष्ठ गोड बोलतील. मात्र लक्षात आल्यावरही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्‍त करू नका. मनस्वास्थ व प्रकृतीचे तंत्र सांभाळा. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 11, 12.


प्रियजनांच्या गाठीभेटी
कामाची पूर्तता झालीच पाहिजे हा अट्टाहास तुमचा असतो मात्र या सप्ताहात थोडेसे लवचिक धोरण स्वीकारून व वेगळ्या मार्गाचा अवलंब करून यश मिळवाल. आवश्‍यक तेथे हात सैल सोडाल. व्यवसायात फायदा वाढविण्यासाठी ओळखीचा उपयोग होईल. मात्र पैशाचा हव्यास धरू नका. नोकरीत कामानिमित्ताने अधिकार व सवलती मिळतील. मात्र त्याचा गैरवापर टाळा. पाहुण्यांची सरबराई कराल.
शुभ दिनांक : 9, 10, 11, 12, 13.


प्रवासाचे योग
या सप्ताहात तुमचे म्हणणे सर्वांनी ऐकावे हा अट्टाहास धरू नका. नको त्या कामात वेळ घालवण्यापेक्षा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष द्या. व्यवसायात नियोजनबद्ध काम केलेत तर कामाचे समाधान मिळेल. महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन फायदा मिळवण्याचा विचार असेल . नवीन कामे ओळखीतून मिळतील नोकरीत स्वत:चे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील.
शुभ दिनांक : 8, 11, 12, 13, 14.पैशाची चिंता मिटेल
दुसऱ्याच्या मनातले ओळखून तुम्ही तुमचा पावित्रा ठरवा. या सप्ताहात व्यवसायात कामाचे प्रमाण चांगले राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता दूर होईल. नोकरीत स्वार्थ व परमार्थ दोनही साधू शकाल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्व सहकारी व वरिष्ठांना कळून येईल. घरात तरुणांचा विवाह ठरतील. तुमच्याच कामामुळे इतर कामे लांबणीवर पडतील.
शुभ दिनांक : 9, 10, 13, 14.सावधगिरी बाळगा
“तेरड्याचा रंग तीन दिवस’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींकडून नवीन अनुभव येतील. अनपेक्षित कामांना कलाटणी मिळेल. कामात परिस्थिती सुधारल्याने इच्छा-आकांक्षा वाढतील. कुणालाही आश्‍वासन देताना त्याची पूर्तता करू की नाही याचा अंदाज बांधा. कामानिमित्त प्रवास घडेल. मिळालेल्या अधिकारांचा जरुरीपेक्षा जास्त वापर होणार नाही याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 8, 11, 12.पैशाची सोय होईल
मनातील बेत प्रत्यक्षात साकार होण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून कामाची उलाढाल वाढवाल. मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी भविष्यात होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेऊन कार्यपद्धती आखाल. पैशाची सोय होईल. घरात तात्विक वाद होतील तरी रागावू नका. मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंद वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 11, 12.


वैचारिक मतभेद
तुमचा किचकट व चेंगट स्वभाव बाजुला ठेवून कामात उत्कृष्ट दर्जा देण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींना कसे हाताळता त्यावर तुमची यशाची भिस्त राहील.तडजोडीचे धोरण ठेवून पुढील कामे मार्गी लावाल. नोकरीत कामात हळू हळू सुधारणा दिसेल. केलेल्या चुका निस्तरून नवीन कामे हाती घ्याल. कामात तुमची झलक दिसेल. घरात फुकटचा सल्ला देऊ नका. वैचारिक मतभेद होतील.
शुभ दिनांक : 8,9,10,11, 12.


कामाचा व्याप वाढेल
कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे करा. महत्वाच्या कामांचा अग्रक्रम ठरवून ती वेळेत पूर्ण करा. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. ज्यामुळे पूर्णकामाचे आश्‍वासन देताना जरा जास्तीची मुदत द्या. कामाची वसुली करण्याकडे लक्ष द्या.विशेष सवलतीचे आमिष दाखवून जादा काम करून घेतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 11, 12, 13,14.

 


 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)