साप्ताहिक राशी-भविष्य

25 फेब्रुुवारी ते 03 मार्च 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 
लग्नी मंगळ व हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शनी, प्लुटो, दशमात शुक्र व केतू, लाभात रवी, नेप्च्यून तर व्ययात बुध आहे. वरील ग्रहमान तुमची उमेद वाढवणारे आहे. कामात जिद्द व चिकाटी ठेवून कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. चांगली बातमी कळेल. वातावरण आनंदी राहील. 

पैशाची चिंता मिटेल 

“नाही’ हा शब्द तुम्हाला आवडत नाही. त्यामुळे जिद्दीने कामे पूर्ण कराल. व्यवसायात नवी उलाढाल करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. पैशाची चिंता मिटेल. हितचिंतकाच्या मदतीने नवीन कामेही मिळतील. चांगले काम हातून घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कुटुंबासाठी वेळ व पैसे खर्च कराल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. वातावरण आनंदी राहील. 
शुभ दिनांक : 25, 28, 1, 2, 3 

जोडधंद्यातून कमाई 

पैशाचे गणित अचूक ठरेल. व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने मनोकामना पूर्ण होतील. स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत नवीन कामाची संधी येईल. मिळणाऱ्या संधीचा फायदा करून घ्या. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. घरात सांमजस्याने वागून प्रश्‍नांची उकल कराल. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे लागेल. 
शुभ दिनांक : 26, 27, 3 

चांगली बातमी कळेल 

जीवनात काही ठोस निर्णय घ्यायची बऱ्याच दिवसांची खुमखुमी येईल. नवीन साहस कराल. मनाला पटेल रूचेल तीच कामे कराल. योग्य व्यक्‍तींची मदत योग्य वेळी घ्यावी लागेल. जे पैसे मिळतील त्यात समाधानी राहाल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाल. नवीन नोकरीचे काम मार्गी लागेल. घरात चांगल्या बातमीने आनंद मिळेल. शुभकार्ये होतील. मानसन्मानाचे योग येतील. 
शुभ दिनांक : 25, 28, 1, 2. 

कामानिमित्त प्रवास 

कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे हातावेगळी कराल. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अथक प्रयत्न कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत दिलेली कामे संपवून सहकाऱ्यांनाही मदत कराल. कामानिमित्ताने प्रवास होईल. महत्वाची कामे प्राधान्याने मार्गी लावा. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग. 
शुभ दिनांक : 25, 26,27, 3. 

अनपेक्षित कामे होतील 

जीवनाचा भरपूर आस्वाद घ्याल. पूरक ग्रहमान असल्याने पैशाची ऊबही मिळेल. व्यवसायात उलाढाल मनाजोगती राहील. नवीन योजना कार्यान्वित करून त्यात प्रगती कराल. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेऊन कामात हवा तसा प्रतिसाद मिळवू शकाल. नोकरीत पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळतील. वरिष्ठ कामासाठी सवलती व अधिकार देतील. घरात मनोकामना पूर्ण होतील. 
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 1, 2 

जोडधंद्यातून लाभ 

ग्रहांची मर्जी राहील. तेव्हा कार्यतत्पर राहा. व्यवसायात कामाचा वेग जास्त असेल. विक्री उलाढाल वाढवून नवीन उच्चांक प्रस्थापित करू शकाल. तुमची बाजारातील प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत हातून चांगली कामगिरी घडेल. चांगले लाभ होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. घरात प्रियजनांच्या जीवनात सुखद प्रसंग साजरे कराल. संस्मरणीय घटना घडेल. त्यामुळे जीवन उजळून निघेल. 
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 1, 2,3 

कामाचा ताण वाढेल 

कामामुळे विश्रांती घ्यायला उसंत मिळणार नाही. व्यवसायात हितचिंतक मदत करतील व नवीन कामे मिळतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. काही तरी नवीन करून दाखविण्याची इच्छा होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. विशेष आर्थिकदृष्ट्या सवलती मिळतील. खर्चाचे प्रमाणही वाढेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. 
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 1, 2, 3 

कामानिमित्त प्रवास 

आहे त्यात समाधानी राहा. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे संपवा. कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील. पैशाची आवक समाधानकारक राहील. केलेल्या कामाचे श्रेय ताबडतोब मिळेल ही अपेक्षा नको. जोडधंद्यातून जादा कमाई करण्याची संधी मिळेल. घरात कुटुंबासमवेत कार्यक्रम ठरवाल. वेळ मजेत जाईल. मुलांकडून सुवार्ता कळेल. आरोग्य चांगले राहील. 
शुभ दिनांक : 26, 27, 28, 1, 2, 3. 

अपेक्षित प्रगती 

“प्रयत्नांती परमेश्‍वर’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात आत्मविश्‍वास दांडगा राहील. एखादे भव्यदिव्य करून दाखविण्याची खुमखुमी येईल. इतरांची पर्वा न करता कामात स्वत:ला झोकून द्याल. अपेक्षित प्रगती दिसू लागेल. नोकरीत तुमच्यातील कार्यतत्परता दाखवून द्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. घरात आवडत्या छंदात वेळ घालवाल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. 
शुभ दिनांक : 25, 28, 1, 2, 3 

चांगली बातमी कळेल 

तुमच्या स्वभावाला पूरक वातावरण राहील. त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हीच ठरवा. व्यवसायात रेंगाळलेली कामी मार्गी लावाल. भविष्यात उपयोगी पडणारे निर्णय घेऊन कामात प्रगती साधाल. गोड बोलून कामे करून घ्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामे हाती घ्या. योग्य व्यक्‍तींची मदत महत्वाचे निर्णय घेताना होतील. घरात तरुणांचे विवाह ठरतील. वातावरण आनंदी राहील. 
शुभ दिनांक : 25, 26, 27, 3. 

खर्च कराल 

“मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ही म्हण सार्थ ठरेल. इच्छा फलद्रुप होतील. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींचे सहकार्य मिळेल. तुम्ही फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन संधी दृष्टीक्षेपात येईल. त्याचा लाभ घ्या. नोकरीत तुमची प्रगती वाखाणण्याजोगती असेल. कामात वरिष्ठांची विश्‍वासार्हता संपादन करू शकाल. मुलांच्या सुखासाठी थोडा वेळ द्याल. खर्चही कराल. 
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 1, 2 

खरेदीचा मोह 

मनोनिग्रह चांगला असेल त्याचे जोरावर व्यवसयात कामे उरकाल. नवीन योजना दृष्टीक्षेपात येतील. पैशाची कुवत ओळखून मगच पुढे जा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रीत करा. नोकरीत सहकाऱ्यांची साथ मिळेल. त्यामुळे कामाचा भार हलका होईल. घरात खर्चिक वस्तु खरेदीचा मोह होईल. तणावाचे वातावरण कमी होईल. प्रकृतीची कुरबुरही कमी होईल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ जाईल. 
शुभ दिनांक : 26, 27, 28, 1, 2, 3 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)