नवी दिल्ली: तामीळनाडूतील गाजा चक्रीवादळानंतर आठवडाभरातच तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे गाजा चक्रीवादळ शमले असले, तरी त्याने केलेल्या विध्वंसाचे स्वरूप भयानक आहे. 50 बळी घेणाऱ्या गाजामुळे इतर हानीबरोबरच हजारो हेक्टर जमिनीवरील शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. तामीळनाडूतील शेतकऱ्यांवर हे मोठेच अस्मानी संकट असून शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतीच्या नुकसानीने निराश झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आठवडाभरात आत्महत्या केल्या आहेत.
पुडुडुुकोताई जिल्ह्यातील तिरुचेवल नावाच्या शेतकऱ्याने शनिवारी आत्महत्या केली. सुमारे 25 एकर जमिनीवरील उत्पन्न पूर्णपणे नष्ट झाल्याने त्याने आत्महत्या केली. त्यापूर्वी सुंदरराज (58) या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली होती. गाजाने घेतलेला तिसरा बळी त्रिची जिल्ह्यातील सेल्वराजचा आहे. त्याने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली.
वादळाने शेतीच्या झालेल्या नुकसानी बद्दल राज्य सरकार देत असलेली भरपाई अगदीचे तुटपुंजी असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या केलेल्या सुंदरराज यांना 5 एकरमधील शेती नष्ट झाल्यानंतर केवळ 1700 रुपये भरपाई मिळाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा