वेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय !!

वेबसीरिजच्या जगतात ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ ह्या भूमिकांनी इतिहास घडवला. ह्या भूमिका जेवढ्या लोकप्रिय आहेत. तेवढ्याच त्यांच्या वेबसीरिजही. नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राइमची ‘मिर्ज़ापुर’ ह्या दोन्ही क्राइम थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. तर ह्या महिन्यातच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ आजही चार्ट्सवर टॉप-5मध्ये पोहोचली नाही आहे.

स्कोर ट्रेंड्सच्या आकड़्यांनूसार, लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापुर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित साध स्टारर अमेझॉन प्राइमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सायनी गुप्ता स्टारर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय-मोना सिंह स्टारर ‘कहने को हमसफर है’ पांचव्या स्थानी आहे.

सध्या सॅक्रेड गेम्स आणि मिर्ज़ापुरच्या दूस-या सीझनची तयारी सुरू आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजिटल आणि व्हायरल न्यूज़मध्ये ह्या दोन्ही वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)