कमजोर मोदींना जिनपिंग यांची भीती वाटते ; राहुल भाजपचा पलटवार

नवी दिल्ली: पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसुद अजहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या मार्गात चीनने अडथळा आणला. त्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. चीनने आणलेल्या अडथळ्यावरून मोदी त्या देशाविरोधात एक शब्दही बोलले नाहीत. कमजोर मोदींना चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांचे भय वाटते, अशी टिप्पणी राहुल यांनी केली.

राहुल यांनी ट्विटरवरून मोदींवर निशाणा साधला. जिनपिंग 2014 मध्ये भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी मोदींनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. जिनपिंग यांच्यासमवेत मोदी झोपाळ्यावर बसले, मोदींनी त्यांना मिठी मारली याचा उल्लेखही राहुल यांनी केला. दरम्यान, भाजपने राहुल यांच्यावर पलटवार केला. संपूर्ण भारत व्यथित असताना कॉंग्रेस अध्यक्ष आनंदी मूडमध्ये आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात 2009 मध्ये चीनने असाच खोडा घातला. त्यावेळी राहुल काही का बोलले नाहीत? राहुल यांची टिप्पणी पाकिस्तानात हेडलाईन न्युज बनेल. त्या बातमीचे वितरण जैशच्या कार्यालयात आनंदाने होईल, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)