पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चेला सुरुवात करू – राष्ट्रवादी काँग्रेस

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात  पक्षाने अनेक आश्वासने दिली असून पाकिस्तान सोबतच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य केले आहे. या जाहीरनाम्यात पाकिस्तानच्या संबंधावर सत्तेत आल्यास पाकिस्तान सोबत पुन्हा चर्चेला सुरुवात करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसने लिहिले आहे.

पुलवामा दहशतवादी हमला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोटच्या घटनेनंतर एकीकडे पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करू नये, अशी मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र पाकिस्तान सोबत चर्चा करूनच वाद मिटवावा असे या जाहीरनाम्यात म्हंटले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीचे महासचिव डी पी त्रिपाठी यांनी सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी चर्चा करणे हे अधिक गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.

परराष्ट्र धोरणासंबंधी  मते मांडताना  राष्ट्रवादी काँग्रेसने चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा उल्लेख केलेला आहे. सत्तेत आल्यास पाकिस्तान सोबतच्या चर्चेला पुन्हा वाट मोकळी करून देण्यात येईल आणि त्यामध्ये दहशतवाद हा मुख्य मुद्दा असल्याचे म्हंटले आहे. चीनचा उल्लेख करत चीनसाठी चर्चेचे मार्ग खुले ठेण्यात येईल असे राष्ट्रवादीने म्हंटले आहे, तसेच चीनने भारतात तयार झालेल्या औषधे, कृषी उत्पादने आणि आयटी क्षेत्रासाठी आपली बाजारपेठ खुली करावी अशी मागणी करण्यात येईल, असे जाहीरनाम्यात आहे.

तसेच रशियाचा उल्लेख जाहीरनाम्यात करत, सध्याच्या सरकारने रशिया सारख्या जुन्या मित्र देशाला दुर्लक्षित केले असल्याचे म्हणत रशियासोबतचे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यात येतील म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)