अन्य पक्षांसाठी जागांचे बलिदान नाही- राहुल गांधी 

काँग्रेस पक्षप्रमुख राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी तेलंगणा येथील काँग्रेसच्या नेत्यांशी दिल्ली येथील वॉर रूममध्ये  चर्चा केली. यात त्यांनी काही मुद्दे उचलून धरले त्यातील मुख्य मुद्दा म्हणजे, ज्या जागांवर काँग्रेस अगोदरपासून विजयी आहे त्या जागा ते युती असलेल्या पक्षांसाठी नाही सोडणार.

राहुल गांधी यांनी जरी हे तेलंगणा येथील नेत्यांशी बोलले असले तरी पूर्ण देशात हाच फॉर्मुला लागू केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यामंत्री केसीआर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव देखील दिला होता.  त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली होती.

राहुल यांनी प्रथम सर्वांशी व्यक्तिगत मुलाखात घेतली त्यानंतर त्यांनी बैठकीला संबोधित केले.राहुल गांधी म्हणाले, राज्यात जर टीडीपी, सीपीआई  आणि टीजेएस यांच्याशी युती झाली तर ते पक्षाचे हीत पाहून केले जाईल. येथे आम्ही मजबूत आहोत त्या जागेची  युतीतील अन्य पक्षासाठी बलिदान केले जाणार नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)