…तर महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर आमचे उमेदवार उभे करू- प्रकाश आंबेडकर

श्रीरामपूर: राज्यातील सर्व जागांवर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार उभे करेल,असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडर यांनी म्हंटले आहे. आंबेडकर यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लोकसभेच्या १२ जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस आम्हाला १२ जागा देण्यास तयार नसेल, तर महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर आमचे उमेदवार उभे करू,असे आंबेडकर श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपविरोधात महाआघाडी करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्यास त्यांनी सांगितले आहे. आंबेडकर यांनी आधीपासून महाआघाडीत येणास फारशी उत्सुकता दर्शवलेली नाही. मात्र त्यांनी एमआयएम सोबत बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेस पक्षाने द्यावा, त्यानंतरच आम्ही १२ जागांवर चर्चा करू. सलग तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ज्या जागांवरती अपयश मिळाले. त्या जागा आम्हाला द्याव्या असे,आंबेडकरांनी सांगितले. जर काँग्रेसने या जागा आम्हला दिल्या नाही. तर आम्ही  महाआघाडीत येणार नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)