देश सुधारू शकतो हे आम्ही दाखवून दिले : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: तुम्ही लोकांची सेवा करायची या भावनेने सरकार चालवले आणि भ्रष्टाचारापासून स्वताला दूर ठेवले तर सरकार एखाद्या राज्यातील परिस्थिती बदलू शकते हे आम्ही दिल्लीत गेल्या चार वर्षांच्या कारभारातून दाखवून दिले आहे. याच भूमिकेतून काम करणारे सरकार केंद्रात सत्तेवर आले तर देशही सुधारू शकतो हेच आम्ही आमच्या दिल्लीतील कामातून दाखवून दिले आहे असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

ते म्हणाले की चांगले काम करणारे सरकार असले की त्यांच्यासाठी ऍन्टि इंकंबसी किंवा प्रो इंकंबसी असा प्रकारच उद्‌भवू शकत नाही. त्यामुळे आमच्या बाबतीतही तो प्रकार येथे उद्‌भवणार नाही. आमच्या कामामुळे लोक पुन्हा आमच्याच पाठिशी उभे राहतील असे त्यांनी आज पक्षाच्या नॅशनल कौन्सिलच्या बैठकीत बोलताना सांगितले. हा देश किंवा येथील सिस्टीम सुधारू शकते हाच विश्‍वास आम्ही लोकांच्या मनात जागवला आहे असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्लीत मोदी सरकारने आम्हाला खूप त्रास दिला. अनेक अडथळे आणले पण आमच्या ठाम निर्धारामुळे आम्हाला येथे काही घडवता आले असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. आज देशात लोकांपुढे मर्यादित पर्याय असल्याने त्यांच्यावर कॉंग्रेस किंवा भाजपला मतदान करण्याची जबरदस्ती होते. त्यांच्यापुढे चांगला पर्यायच आत्तापर्यंत उपलब्ध झाला नव्हता पण आता आम्ही तो आम आदमी पक्षाच्या माध्यमातून दिला आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपचा पराभव झाला पण हा कॉंग्रेसचाही विजय नव्हता कारण लोकांपुढे तिसरा पर्यायच उपलब्ध नव्हता असे ते म्हणाले.

मोदी सरकारकडून आपल्याला कसा त्रास झाला याची माहितीही केजरीवालांनी यावेळी दिली. ते म्हणाले की पोलिस आणि सीबीआयने माझे नुसते कार्यालयच नव्हे तर किचन आणि बेडरुमही तपासली पण त्यांना काहीच मिळाले नाही. मी देशातला असा एकमेव मुख्यमंत्री होती की मला शिपायाच्या बदलीचेही अधिकार नव्हते अशा अवस्थेत आम्ही काम केले असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)