आपण लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे : के के मेनन

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने जेष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आपल्यासोबत १० वर्षांपूर्वी गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता. तनुश्रीने #MeToo मोहिमेअंतर्गत नानांवर आरोप केल्यानंतर विविध क्षेत्रातील अनेक महिला पुढे आल्याअसून त्यादेखील आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत.
दरम्यान आज सुप्रसिद्ध अभिनेता के के मेनन याने याबात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले की “लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जर लैंगिक अत्याचाराचे आरोप होत असतील तर त्या मागील सत्यता पडताळणे हे गरजेचे आहे. अशा घटना समाजातून पूर्णपणे कशा हद्दपार करता येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
संबंधित वृत्त:

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)