भारताकडून पहिल्यांदा पराभव झालेला नाही, हे सर्व चालूच असते – पाक कर्णधार 

file photo

नवी दिल्ली – भारताविरुद्ध सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी अजूनही आपल्या संघावर नाराज आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदच्या वक्तव्याने पाक क्रिकेटप्रेमींचा रोष वाढण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या पराभवाची चिंता नसल्याचे सरफराजने म्हंटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात चांगले प्रदर्शन करण्याचा विश्वास सरफराज याने व्यक्त केला आहे.

सरफराज म्हणाला कि, विश्वचषकात भारताकडून पहिल्यांदा पाकिस्तानी संघाचा पराभव झालेला नाही. आणि हे सर्व चालूच असते. पुन्हा पुनरागमन होईल अशी आशा असल्याचेही त्याने सांगितले. भारताकडून पराभव स्वीकारणे आमच्यासाठी थोडे कठीण होते. परंतु, सामन्यानंतर आम्ही आमच्या खेळाडूंना दोन दिवसाचा आराम दिला. त्यानंतर आम्ही कठोर मेहनत घेतली आहे. यामुळे संघाचे मनोबल उंचावले असून  दक्षिण आफ्रिकेवर नक्कीच विजय प्राप्त होईल, असा विश्वास सरफराजने व्यक्त केला.

पाकिस्तान क्रिकेट संघ आतापर्यंत पाचपैकी केवळ एकच सामन्यात विजय मिळविण्यास यशस्वी झाली आहे. परंतु, भारताविरुद्धच्या सामन्यात ८९ धावांनी पराभव झाल्याने सरफराजला मोठ्या टीकेचा सामना करवा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)