वातावरण बदलाचे परिणाम रोखण्यासाठी जगाला अत्यंत कमी वेळ

संयुक्तराष्ट्रांनी दिला व्यापक उपाययोजनांचा अंतिम इशारा

इंचेऑन: वातावरणातील बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या परिणामाचे पृथ्वीला मोठे संकट असून त्यापासून वाचायचे असेल तर सर्वच समाजात व्यापक बदल करण्याची गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्थांनीही त्यात मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे. या उपाययोजनांसाठी आपल्या हातातील वेळ आता वेगाने निघून जात आहे असे संयुक्तराष्ट्रांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

-Ads-

या संबंधातील काही निरीक्षणे ठळकपणे नोंदवताना संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे की वातावरणातील बदलामुळे पृथ्वीचे तापमान 1 अंश सेल्सीयसने वाढले आहे. त्यातून समुद्राची पातळी वाढणे, वादळे आणि नैसर्गिप आपत्ती वारंवार उद्‌भवणे, पूर आणि दुष्काळासारख्या आपत्तींचा सामना करावा लागणे अशी संकटे पृथ्वीवर वारंवार उद्‌भवणार आहेत. त्यातून पुन्हा तापमान वाढीचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. पृथ्वीचे तापमान जर आणखी 3 ते 4 अंशांनी वाढले तर अत्यंत विनाशकारी स्थिती आपल्या सर्वांपुढे उद्‌भवू शकते असा इशारा संयुक्तराष्ट्रांनी दिला आहे.

सध्याचे पृथ्वीवरील विषारी वायुंच्या उर्त्सजनाचे प्रमाण तसेच कायम राहिले तर सन 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान 1.5 अंशांपर्यंत वाढू शकते.त्यामुळे पुढील काही वर्षे मानवी इतिहासासाठी अत्यंत महत्वाची आहेत असे वातावरणाच्या बदलाच्या संबंधातील एका समितीचे प्रमुख डेब्रा रॉबर्टस यांनी म्हटले आहे. तापमान वाढीचा हा धोका कल्पनेपेक्षाही लवकर निर्माण होत असून त्याचे परिणामही कल्पनेपेक्षा अधिक असतील असेही त्यांनी म्हटले आहे. वातावरणाच्या बदलाच्या संबंधातील एकूण सहा हजार अहवाल तपासून संयुक्तराष्ट्रांनी साऱ्या जगाला हा इशारा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)