आम्हाला खासदार झाल्यासारखं वाटतंय ..!

सातारा – नायक हा हिंदी चित्रपट सेट मॅक्‍स चित्रवाहिनीवर वारंवार प्रदर्शित केला जायचा. त्याचा काही अंशी परिणाम सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निश्‍चितपणे झाला. त्यानंतर वर्षभरापुर्वी मला आमदार झाल्यासारख वाटतंय, हे रोमॅंटीक गाणे देखील येवून गेले. आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पार्श्‍वभूमीवर राजकीय नेत्यांची धावाधाव, आचारसंहितेमुळे ओसाड पडलेली शासकीय कार्यालये, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झालेले पोलीस प्रशासन पाहता खऱ्या अर्थाने मतदार राजाला खासदार झाल्याचा फिल आल्याशिवाय राहणार नाही.

उमेदवारी अर्ज भरतांय का ?
लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव निवडणूका ह्या आनंदात पार पडाव्यात. त्यामध्ये कोठे ही कसूर राहू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. इतरवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकाला जसा अनुभव येतो, तसा अनुभव किमान निवडणूक कालावधीत येणार नाही. विशेषत: निवडणूकी संबधी एखाद्या शंकेचे निरसन करण्यासाठी कार्यालयात गेला तर त्याचे निर्सन तात्काळ होवून जाते. निवडणूकीशी निगडीत प्रत्येक अधिकाऱ्यांची भेट तात्काळ मिळू शकते. एवढेच काय, उमेदवारी अर्ज भरणार असाल तर प्रशासन आपल्यासाठी स्वागतासाठी सज्ज आहे, असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक जाहीर झाली. आता किमान 45 दिवस तरी मतदारांच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. कारण, मसल पॉवरचा थेट संबध दोन नंबर धंदेवाल्यांशी येतो.

मसल पॉवरचा किमान निवडणुकीत तरी वापर होवू नये आणि प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने वर्षानुवर्ष सुरू असलेले जुगार अड्डे किमान 45 दिवस तरी बंद रहावेत, या दृष्टीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एवढेच काय तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सातारा जिल्ह्यातील 4 हजार जणांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील एंट्री पॉइंट अन महत्वाच्या मार्गावर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पुर्वअनुभवानुसार एखाद्या उमेदवाराला साधी धमकी जरी देण्याचा प्रकार घडला तर त्या उमेदवाराला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात येईल. किती काळजी ती ? लोकशाही रक्षणाची आणि लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव र्निविघ्न पार पाडण्यासाठी. असो निवडणुकीच्या निमित्ताने तरी सुरक्षिततेचे वातावरण तयार होते, हे ही नसे थोडके.

आचारसंहितेचा सर्वात मोठा परिणाम शासकीय कार्यालयांवर झाल्याचे दिसून येतो. सध्या सर्व कार्यालये ओसाड पडल्याचे चित्र आहे. आचारसंहितेच्या काळात नव्या कामांना मंजुरी नाही, वर्क ऑर्डर नाही आणि बिले काढण्याचा प्रश्‍नच नाही. निवडणूक जाहीर झाल्या झाल्या कंत्राटदारांनी पुर्वीच्या कामांची बिले काढून घेतली. त्यामुळे ना पी.डब्ल्यु.डी, झेड.पी, पंचायत समित्या, नगरपालिका अन नंगरपंचायतींच्या समोर एकाही कंत्राटदाराची आलिशान गाडी आढळून येत नाही. साहजिकच मग निवडणूकीच्या कामाची वरकरणी कारणे देवून कार्यालयातून गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येते. असो, निवडणुकीच्या निमित्ताने असा ही मिळतो शाररिक आराम अन आर्थिक उलाढालीला स्वल्पविराम. हे ही नसे थोडके.

उरतो विषय तो राजकीय नेत्यांचा. प्रत्येक राजकीय नेता आणि कार्यकर्ता सध्या निवडणूकीच्या कामात प्रचंड व्यस्त आहे. प्रत्येकाला मतदार राजाची प्रचंड काळजी पडली आहे. काळजी कोणती ? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्‍न सोडविण्याची नव्हे. नेत्याला काळजी आहे तिकीटाची तर ज्यांना तिकीट मिळालयं, त्यांना काळजी आहे निवडून येण्याची. असो किमान निवडणुकीच्या निमित्ताने तरी ते वरकरणी का होईना उमेदवार मतदारराजाच्या गावात येण्याचा प्रयत्न करतील. जनतेच्या प्रश्‍नांबाबत कळवळून बोलतील. प्रसंगी जनतेचे दु:ख पाहून अश्रु ही अनावर होणार नाहीत. हे ही नसे थोडके. तेव्हा किमान 45 दिवसांचा आंनद घेवूयात. खासदार जेव्हा व्हायचे तेव्हा होवू. किमान निवडणूकीच्या निमित्ताने तयार निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावू अन योग्य खासदार ठरवू.

लोकसभेच्या जागा दोन हजारांपर्यंत वाढवा

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीची चिंता असलेल्या राजकीय पक्षांची देखील संख्या वाढत आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक लढवून लोकशाहीचे रक्षण अन नागरिकांची सेवा करणाऱ्याची इच्छुक उमेदवारांची संख्या ही वाढत आहे. पार्श्‍वभूमीवर लोकसभेच्या देशातील 543 जागा अल्प असल्याचे स्पष्ट होते. अल्प जागांमुळे विशेषत: प्रस्थापित लोकसेवकांची प्रचंड घुसमट होताना दिसून येत आहे. त्यापैकी कोण आपल्या भावाच्या विरोधात लढताना दिसून येतोय तर कोण वर्षानुवर्षाची पक्षनिष्ठा डस्टबीनमध्ये टाकून उमेदवारीसाठी पक्षांतर करताना दिसून येतोय. एवढेच काय तर एकाच घरात जास्त उमेदवारी नको, म्हणून आजोबा अल्पवयीन नातवासाठी स्वत:ची जागा सोडतात. अशावेळी दुसरा नातू आजोबांना निवडणूक लढविण्याचा आग्रह करतो. त्यामुळे स्वाभाविक वर्षानुवर्ष एकत्रित कुटुंबातील विसंवादाचा संदेश समाजासमोर गेल्याशिवाय राहत नाही. हे सर्व रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने अत्तापासून तयारीला लागले पाहिजे. लोकसभेच्या 543 जागांमध्ये देश आणि कुटुंबे सामावू शकत नाहीत. त्यासाठी लोकसभेच्या जागा किमान दोन हजारांपर्यंत वाढविण्याची नितांत गरज आहे.

उमेदवारी अर्ज भरतांय का ?

लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव निवडणूका ह्या आनंदात पार पडाव्यात. त्यामध्ये कोठे ही कसूर राहू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. इतरवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकाला जसा अनुभव येतो, तसा अनुभव किमान निवडणूक कालावधीत येणार नाही. विशेषत: निवडणूकी संबधी एखाद्या शंकेचे निरसन करण्यासाठी कार्यालयात गेला तर त्याचे निर्सन तात्काळ होवून जाते. निवडणूकीशी निगडीत प्रत्येक अधिकाऱ्यांची भेट तात्काळ मिळू शकते. एवढेच काय, उमेदवारी अर्ज भरणार असाल तर प्रशासन आपल्यासाठी स्वागतासाठी सज्ज आहे, असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

पुणे-मुंबईची मंडळी परतू लागली

किती ही छोटी असो वा मोठी निवडणूक लागली की, पुणे-मुंबईचे मतदार आपल्या गावाकडे हमखास येतात. ते आले नाही तर आणण्यासाठी हवे ते वाहन रवाना केले जाते. साहजिकच हे मतदार पोटापाण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये कष्टासाठी गेलेली असतात. यंदाच्या निवडणुकीत त्यांना आणण्याचे अत्तापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीनंतर अधिक काळ पुणे-मुंबईत वास्तव्य करणारी राजकीय मंडळी ही देखील परतताना दिसून येतील. मात्र, त्यांना विचारू नका की इतक्‍या दिवस आपण होतात कोठे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)