आम्हाला राजकारणातील बाराखडी देखील कळत नाही, पण… – धर्मेंद्र

सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी या देखील भाजपच्याच तिकिटावर मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून अभिनेते धर्मेंद्र हे सध्या पुत्र व पत्नीच्या प्रचारामध्ये सहभाग नोंदवताना दिसत आहेत. आज धर्मेंद्र यांनी पुत्र सनी याच्या उमेदवारीबाबत बोलताना, ‘सनी सर्वार्थाने देशाची सेवा करेल.’ असा विश्वास व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना धर्मेंद्र म्हणाले की, “आम्हाला राजकारणातील बाराखडी देखील माहित नाही परंतु देशभक्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आम्ही देशसेवा करत राहणार, वाटल्यास मी बिकानेरमध्ये काय केलं आहे ते जाऊन पहा. माझ्याप्रमाणेच सनी देखील देशसेवा करेल.”

https://twitter.com/ANI/status/1122836185624326147

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)