आम्ही राजस्थान विकसित केला : अमित शहा

जयपुर: राजस्थान हे राज्य पुर्वी आजारी राज्य होते ते आम्ही विकसित राज्य केले आता पुन्हा येथे सत्ता मिळाली तर आम्ही हे राज्य समृद्ध राज्य करू असा विश्‍वास भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे आज येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. राजस्थानात भाजपच पुर्ण बहुमताने सरकार स्थापन करील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस हे नकारात्मतेचे राजकारण करीत आहे आणि त्यांनी जातीयवादाला आणि अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिले आहे असा आरोपही त्यांनी केला. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही जे विकासाचे राजकारण केले त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे अमित शहा यांनी सांगितले.

बुलंदशहर मध्ये झालेल्या दंगलीच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की या घटनांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. या दंगलीच्या संबंधात काही आरोप केले गेले आहेत पण त्याच्या चौकशीसाठी जी एसआयटी नेमण्यात आली आहे त्यातून नेमके तथ्य बाहेर येईलच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)