अजूनही आम्ही एकत्रच आहोत

हृतिक आणि सुझानने 2000 मध्ये विवाह केला होता. हृतिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’च्या रिलीजनंतर ते विवाहबंधनात अडकले होते. मात्र या दोघांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता. लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोटामागील कारण समोर आले होते. हृतिकचे आपल्या को-स्टार्ससोबत वाढती जवळीक पाहून सुझानने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, असे म्हणण्यात आले. परंतु, सुझानने यावर स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. आता घटस्फोटानंतरही दोघांचे नाते चांगले आहे.

रोशन कुंटुंबीय प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुझान खान आणि तिच्या कुटुंबीयाच्या अन्य सदस्यांना आमंत्रण देते. अनेकवेळा ते एकत्र दिसले आहेत. इतकेच नाही तर हृतिक आणि सुझान अनेकदा एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. घटस्फोटानंतर सुझान खानने पहिल्यांदाच मुलांच्या संगोपनाविषयी सांगितले आहे. इंटिरियर डिझायनर असलेल्या सुझान खान आणि हृतिकची दोन मुले रिदान आणि रेहान आहेत. तिची आई झरीन खान आणि फराह खान अली, सिमोन अरोरा या दोन्ही बहिणी माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या आहेत. माझी दोन्ही मुले नेहमीच मला प्रेरणा देतात. काम आणि घरामध्ये मी एक रेषा आखली आहे. तेव्हाच तुम्ही आपल्या कामासाठी प्रेरित व्हाल आणि घरात शांतीदेखील असेल. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये सीमारेषा असणेच फायद्याचे असते.

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळे असावे, असे म्हणणाऱ्या सुझानने मात्र हृतिकच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफ घुसवून संसार मोडायला भाग पाडले होते. आता ती मात्र स्वतःच्या प्रोफेशनल लाईफबाबत खूप काळजीने बोलू लागली आहे. हृतिक आणि सुझान या दोघांनी पुन्हा एकत्र यावे आणि पुन्हा विवाहबद्ध व्हावे यासाठी रोशन कुटुंबीयांकडून मध्यंतरी प्रयत्न केले गेले होते. त्यांच्या पुन्हा लग्नाच्या तयारीविषयी अफवाही पसरल्या होत्या. अजून तरी या दोघांकडून तसे अधिकृत सूतोवाच करण्यात आलेले नाही. पण किमान अजून एकत्र आहोत असे हे म्हणत आहेत, हे काही कमी नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)