विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – स्टीव वाॅ

आॅस्ट्रेलिया संघाचा माजी कप्तान आणि फलंदाज स्टीव वाॅ याने विराट कोहली हाच सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे असे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याने याबदल स्पष्टीकरण सुध्दा दिले आहे.

जगात क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण या मुद्दयावर माजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षक यांची मते वेगवेगळी आहेत. भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली हा सर्वोत्तम आहे असे काहीजण म्हणतात तर काहीजण इंग्लंडचा जो रूट, आॅस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव स्मिथ हा दावेदार आहे अशी मत मांडतात. पण आॅस्ट्रेलिया संघाचा माजी कप्तान स्टीव वाॅ याने मात्र विराट कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज आहे असे म्हटले आहे.

-Ads-

स्टीव वाॅ ने विराटच सर्वोत्तम फलंदाज का याचे कारण देताना म्हटले की, विराट कडे असे तंत्र आहे की, त्याच्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तम फलंदाजी करू शकतो आणि त्याने ते त्याच्या खेळीतून सिध्द देखील केले आहे. सध्या विराटसारखे फलंदाजीचे तंत्र जगातील दुसऱ्या कोणत्याच फलंदाजाकडे नाही आहे.

काही दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा नंबर 1 चा फलंदाज झाला आहे. त्याने आॅस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथला मागे टाकत हा क्रमांक प्राप्त केला आहे.

संबंधित बातमी…   वनडे वा टेस्ट विराटच बेस्ट !!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)