औद्योगिकरणासाठी पाण्याचा सुयोग्य वापर आवश्‍यक: सुरेश प्रभू 

नवी दिल्ली, दि. 4-वाढती लोकसंख्या आणि वातावरणातील बदल हे भारतातील जलस्रोतांसमोरचे महत्त्वाचे आव्हान असल्याचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. या संदर्भात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. देशातील पाण्याचा तुटवडा आणि पाण्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी सुमारे 78 टक्‍के पाणी कृषी क्षेत्रासाठी वापरले जाते. 2024 सालापर्यंत देशात लोकसंख्येचा विस्फोट होण्याची शक्‍यता लक्षात घेत त्या तुलनेत पाण्याची कमतरता भासू शकेल, असे ते म्हणाले.

कृषी क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आवश्‍यक असल्याचे मत प्रभू यांनी व्यक्‍त केले. कृषी असो वा उद्योग, सर्वच क्षेत्रांमध्ये पाण्याच्या शाश्वत वापरावर भर देण्याची आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली. देशात भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याबद्दल प्रभू यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या तुलनेत भारतात कृषी क्षेत्रासाठी भूजलाचा वापर 3 ते 4 पट जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)