पिण्यासाठी तब्बल अकरा टीएमसी पाणी राखीव

File Photo

आॅक्टोबरपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

आरक्षित पाणीसाठा (दशलक्ष घनफूटमध्ये)

मुळा – 2 हजार 946
कुकडी – 3 हजार 28
भंडारदरा – 2 हजार 185
दारणा-गंगापूर – 1 हजार 210
जायकवाडी – 288
पालखेड – 130
मध्यम प्रकल्प – 325
लघु प्रकल्प – 655

नगर – दुष्काळी परिस्थिती विचारात घेवून जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, दारणा, कुकडी या प्रमुख प्रकल्पांसह मध्यम प्रकल्प व बंधारे यामधील सव्वा अकरा टीएमसी पाणीसाठा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पिण्यासाठी आरक्षित केला आहे. यंदाच्या वर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या पाण्याचा साठा हा जवळपास दुप्पट आहे.

यंदा जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये सरासरी 369 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे गेल्या पंधरा वर्षांतील सर्वांत निचांकी पर्जन्यमान आहे. अल्प पावसामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऐन नोव्हेंबर महिन्यात टॅंकरची संख्या दोनशेपर्यंत गेली आहे.

अल्प पावसामुळे मोठ्या धरणांबरोबरच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठा अपुरा राहिला आहे. भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. ती आणखी खालावणार असल्याचा अंदाज भुजल सर्वेक्षण व विकास विभागाचा आहे. त्यामुळे 15 ऑक्‍टोबर 2018 ते आगामी 15 जुलै 2019 च्या कालावधीचा विचार जनतेला आणि जनावरांना पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा 11 हजार 303 दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित केला आहे.

गेल्या वर्षांच्या तुलनेत पावणेचार टीएमसी जास्त पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या 276 योजना आहेत. या पाणी योजनांसाठी जवळपास 4 हजार 552 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. तर जनावरांना पिण्यासाठी म्हणून 1 हजार 26 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)