#Budget2019 : ग्रामीण भागात पाण्याच्या सुविधेसाठी “जल जीवन मिशन’

नवी दिल्ली- ग्रामीण भागातील पाण्याच्या शाश्‍वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर जल जीवन मिशन लक्ष केंद्रीत करणार आहे. याची अंमलबजावणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातू केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर पाण्याची गरज आणि पुरवठा याकडे हे लक्ष देणार आहे.

पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, भूजल पुनर्भरण आणि घरगुती सांडपाण्याचे शेतीसाठी व्यवस्थापन याद्वारे पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागात “हर घर जल’ पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन कार्यरत असेल, असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.

देशभरातील 256 जिल्ह्यातल्या 1,592 ठिकाणांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यावर “जल शक्‍ती अभियानचे विशेष लक्ष केंद्रीत केलेले असणार आहे. वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध होणारा निधीबरोबरच सरकारकडून “कॉम्पन्सेटरी अफोरेस्टेशन फंड मॅनेजमेंट ऍन्ड प्लॅनिंग ऍथोरिटी'(कॅम्पा) कडूनही या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)