पिंपरीत उद्यापासून पाणी कपात ; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून पाणीकपात लागू होणार आहे. असे आदेश जलसंपदा विभागाने पालिकेला दिले आहेत  शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्या 49.85 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाकडून आठवड्यातून एकदा पाणी बंद करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळ तालुक्‍यातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात आजमितीला केवळ 49.85 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला धरणात 58 टक्के साठा होता. तो 9 टक्के पाणीसाठा जास्त होता. यावर्षी केवळ 49.85 टक्के आहे. सद्य:स्थितीत महापालिका दिवसाला धरणातून 480 लीटर पाणीउपसा करते. परंतु, पाण्याचा जपून वापर करण्याकरिता रावेत बंधाऱ्यातून दैनंदिन 440 दक्षलक्ष लीटर एवढ्याच पाण्याचा उपसा करण्याबाबत जलसंपदा विभागाने कळविले होते.

नागरिकांनी फरशा, वाहने धुण्यासाठी, बगीचा इत्यासाठी महापालिका पुरवित असलेल्या पाण्याचा वापर करु नये. घरातील, इमारतींमधील, नळांमधुन, पाईप्समधून होणारी पाणी गळती बंद करावी. टाक्‍यांमधून पाणी ओव्हर फ्लो होऊ नये देऊ नये. महापालिकेच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती त्वरित पाणीपुरवठा विभागास कळवावी. सारथी हेल्पलाईनवर तक्रार करावी. पावसाची अनिश्‍चितता, धरणातील वेगाने कमी होत असलेला पाणीपुरवठा याचा विचार करता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)