“वॉटर कप’च्या मंचावर रंगली राजकीय जुगलबंदी

मुख्यमंत्री-अजित पवार-राज ठाकरे यांची फटकेबाजी

पुणे – “आमिर खान यांच्या पुढाकराने सुरू झाएल्या वॉटर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ विविध राजकीय नेत्यांच्या जुगलबंदीने चांगलाच रंगला. आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनला जे जमले, ते आधीच्या आणि आताच्या सरकारला का जमले नाही? असा सवाल करून मनसे नेते राज ठाकरे यांनी या जुगलबंदीला सुरूवात केली. पुढे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत जोरदार फटकेबाजी केल्याने या कार्यक्रमात रंगत भरली.

-Ads-

राज ठाकरे यांनी “आधीचे सरकार आणि आताचं सरकार दोन्ही इथे उपस्थित आहेत. सध्या पाण्याचा प्रश्‍न ज्वलंत झाला आहे. अशा वेळी एक साधा प्रश्‍न मला पडतो, की इतकी वर्षे सिंचनाचा पैसा गेला कुठे? तसेच शासनाच्या कामात संबंधित अधिकारी काम का करत नाही?’ असे प्रश्‍न उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला.

तर राज यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “काहीजण बोलघेवडे असतात. फक्त बोलून सभा गाजवतात आणि निघून जातात. त्यांना काम करायचे नसते.’

राज यांच्या प्रश्‍नांचे उत्तर देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पाण्याबाबतची स्थिती सुधारण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. काही वर्षांपूर्वी सरकारने “पाणी अडवा, पाणी जिरवा’चा नारा दिल्यानंतर गावागावात पाणी अडवण्याऐवजी जात-पात-तंट्यांच्या माध्यमातून एकमेकांना अडवा अन एकमेकांची जिरवा हेच काम झाले. त्यामुळेच जलसंधारणाचे काम यशस्वी झाले नाही. पाणी फाउंडेशनने नेमकी हीच बाब हेरली आणि जलसंधारणाला लोकचळवळ बनवत लोकांमधील एकता जागविली. यातूनच असामान्य काम घडून गावच्या गावे पाणीदार होत आहेत.’

विजय शिवतारे म्हणाले, “एक शिवसैनिक भाजप मंत्र्यांचे कौतुक करतोय, हा काय प्रकार आहे? असे तुम्हाला वाटेल, परंतु जलसंधारणाच्या बाबतीत सध्याचे सरकारने केलेले काम खरेच कौतुकास्पद आहे. याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नसता, तर हे काम इतके चांगल्याप्रकारे झाले नसते.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)