जलवाहिनींना अनेक भागात गळती : लाखो लिटर पाणी वाया

जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार बदला म्हणजे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबेल

सातारा  – सातारा शहराच्या निम्या भागासह उपनगरात पाणी पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाकडून मीटरव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र अधिकारी आणि पाणी गळती काढणाऱ्या ठेकेदांच्या निकृष्ठ दर्जांच्या कामांमुळे गळतीवर लाखो रूपयांचा खर्च केला तरी जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला लागलेली गळती थांबता थांबतच नाही. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक भागात गळतीचे प्रमाण वाढले आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. प्राधिकरणाचे अनेक अधिकारी बदलून गेले मात्र आजही राजकीय वरदहस्तामुळे ठेकेदार काही बदलले जात नाही. गळतीची कामे दर्जेदार होण्यासाठी ठेकेदार बदलावेत म्हणजे नागरिकांच्या पैशाची होणारी उधळपट्टी थांबेल अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सातारा शहराच्या सदरबझार, गोडोली, कोडोली, शाहूनगर, करंजे तर्फ सातारा, शाहुपूरी, पोवई नाका, तामजाईनगर आदी भागांना कृष्णा नदी उद्भव योजनेतून जीवन प्राधिकरणामार्फत मिटरव्दारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांच्या नळांना मिटर लावले असले तरी अनेक ठिकाणी प्राधिकरणाच्या जलवाहिनींना गळती लागली आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी काही मिळत नाही. गळतीची कामे ही दर्जेंदार होत नसल्याने मुबलक पाणी असून नागरिकांना पाणी मिळत नाही. जलवाहिनीतून पाणी येण्याऐवजी हवेंनी मिटर सुसाट पळत असतात. त्यामुळे नागरिकांना पाण्याचीही बिलेही भरमसाठ येत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याऐवजी हवेनेच मिटर फिरत असतात. याला कारण जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. अधिकारी बदलले मात्र प्राधिकरणाचे काम करणारे ठेकेदार काही बदलले गेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान असलेले ठेकेदार पडून आहेत. मात्र मक्तेदारीमुळे ठेकेदार बदलले जात नाहीत. गळतीची कामे निकृष्ठ दर्जाची होत असतानाही त्याच ठेकेदारांना परत कामे दिली जातात. त्यामुळे जीवन प्राधिकरणाला लागलेली गळती काही कमी होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या एक महिन्यापूर्वी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली होती. तेवढ्या पुरते अधिकारी माना हलवतात. नंतर मात्र येरे माझ्या मागल्या अन्‌….अशाच कारभाराचा सारीपाट पुन्हा सुरू असतो. अधिकारीही निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनाच पाठीशी घालत आहेत. नागरिकांच्या पैशाची केवळ उधळपट्टीच सुरू आहे अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. ठेकेदारच बदला म्हणजे कामे दर्जेदार होतील आणि पैशांची उधळपट्टीही थांबेल अशी मागणी केली जात आहे. दरम्यान येथील बुधवार नाका ते मोळाचा ओढा मुख्य रस्त्यावरच प्राधिकरणाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)