चौकीदार भागीदार बनले; राहुल गांधींची मोदींवर टीका

रायपुर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, संसदेत जेव्हा मी राफेल विमान खरेदी प्रकरणावर संरक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर नाही दिले. तसेच नरेंद्र मोदी देखील बोलू शकले नाहीत. टीव्ही मध्ये पहिले तर नरेंद्र मोदी इकडे-तिकडे पाहतात कारण चौकीदार भागीदार बनले आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.

-Ads-

राहुल गांधी पुढे म्हणाले, पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्स मध्ये आले तर त्यांना शिक्षा झाली. मात्र छत्तीसगढ़च्या मुख्‍यमंत्र्यांच्या मुलाच यामध्ये नाव येते तर त्यांना साधी शिक्षा देखील होत नाही. हीच बीजेपी-एनडीएची ‘चौकीदारी’ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)