मुंबई: मराठा क्रांती मोर्चा काळातील वादग्रस्त कार्टुन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चादरम्यान सामनाचे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चावर उपहासात्मक टीका करण्यात आली होती.
या प्रकरणी दत्ता सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात पुसद न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने समन्स बजावून देखील उद्धव ठाकरे, संजय राऊत व इतर लोक न्यायालयात हजर राहिले नाहीत त्यामुळे वॉरंट जारी करण्यात आला आहे.