भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात वॉरंट जारी

भोपाळ: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पात्रा यांनी प्रचारादरम्यान रस्त्यावरच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यासाठी भोपाळ जिल्हा न्यायाधिश प्रकाशकुमार उइके यांनी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.

संबित पात्रा आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. एस. उप्पल यांच्याविरोधात भुवनेश्वर मिश्र यांच्यावतीने ऍड. यावर खान यांनी न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती. तक्रारीनुसार, संबित पात्रा यांनी 27 ऑक्‍टोबर रोजी भोपाळच्या एमपी नगरमध्ये विशाल मेगा मार्टजवळ रास्ता रोको करुन आणि तंबू-खुर्च्या टाकून वाहतुकीचा मार्ग रोखला होता. त्याचबरोबर परवानगीशिवाय पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. याविरोधात निवडणूक आयुक्त कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर न्यायालयाने एमपी नगर पोलीसांना संबित पात्रा आणि एस. एस. उप्पल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, उप्पल यांनी न्यायालयात हजेरी लावून 26 डिसेंबर रोजी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, न्यायालयात हजेरी न लावल्याबद्दल न्यायालयाने संबित पात्रा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)