ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

सातारा – संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सातारा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने वडजल, ता. फलटण येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्याचा उपक्रम वारीत राबविण्यात आला.

रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करणाऱ्या सातारा ज्येष्ठ नागरिक संघाने शहरातील विविध व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने व दवाखाना वारी प्रमुख पांडुरंग खटावकर, वारी दवाखाना प्रमुख डॉ. नंदलाल कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुधीर धुमाळ यांनी दिली.

शहरातील मान्यवरांच्या व नागरिकांच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या गरजेच्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने विविध प्रकारचे औषधे, पाण्याच्याबाटल्या, कागदी पिशव्या व इतर साहित्यांचा समावेश होता. संघाचे पदाधिकारी कार्याध्यक्ष वाय. के. कुलकर्णी, मदनलाल देवी, श्रीमती वैदही देव, सुरेश कुलकणी, सुर्यकांत जाधव, प्रा. अविनाश लेवे, ठाकूरभाई शहा, विजयकुमार रणदिवे, निता चावरे, ज्योती मोहिते, अंजली देव, शिल्पा कुलकर्णी, सावंत, वासंती लावघरे, सुमनडोंगरे, जाधव, इनामदार तसेच डॉ. गोखले, डॉ. माधवी लिमये, डॉ. रवि भोसले, डॉ. करंबेळकर, डॉ. देवधर त्याचबरोबर संघाच्या सभासदांनी पालखी सोहळ्यासाठी आर्थिक मदतही केली.

संघाच्या डॉक्‍टरांसह संघाचे निवडक सदस्य पालखी सोहळ्यासाठी वडजल येथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते. वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना औषधे व इतर वस्तूंचे वितरण करण्यात आले. संघाच्या या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी, वडजल गावचे सरपंच सौ. हुमरे व त्यांचे सहकारी, त्याचबरोबर पोलिस अधिकारी यांनीही ज्येष्ठ नागरिक संघाचे कौतुक करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)