श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या चांदीच्या पादुकांना आज नीरा नदीतील दत्तघाटावर नीरास्नान घालण्यात येणार आहे. लाखो वैष्णवांच्या या वारी सोहळ्याने मोठ्या उत्साहात आणि टाळ मृदंगाच्या निनादात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.
दरम्यान, आता पुणे पोलिसांची हद्द याठिकाणी समाप्त झाली असून सातारा पोलीस आपले कर्तव्य बाजावण्यास तत्पर आहेत.