एसएनडीटी महाविद्यालयात नर्सरीतील लहानग्यांसाठी वारीचे आयोजन

पुणे – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून आज टाळ मृदूंगाच्या गजरामध्ये अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी पांढुरपूरमध्ये दाखल झाले आहेत. उद्या म्हणजेच शुक्रवारी महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाणार असून यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत.

दरम्यान, दरवर्षी पालखी सोहळ्यानिमित्ताने विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन होणारा महाराष्ट्र यंदाही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्रातील अबाल वृद्ध विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आकंठ बुडाले असून याचाच प्रत्यय आज एसएनडीटी महाविद्यालयातील नर्सरी विभागाच्या लहानग्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये देखील आला. एसएनडीटी विद्यालयातील होम सायन्स डिपार्टमेंटमध्ये प्लेग्रुप व नर्सरी स्कुल सुरु करण्यात आले असून नर्सरीतील विद्यार्थ्यांसाठी आज महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडी सोहळ्यामध्ये लहानग्यांनी वारकरी व विठ्ठल-रुक्मिणीच्या पेहरावात हजेरी लावत अवघा परिसर भक्तिमय केला होता. यावेळी दिंडी सोहळ्यामध्ये महाविद्यालय तरुणींनी देखील विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)