#CWC19 : पराभवानंतर भारतीय संघावर वकार यूनुसची टीका, म्हणाला…

लंडन – भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर भारतासह पाकिस्तानचे विशेष लक्ष होते. हा सामना भारताने जिंकला असता तर पॉईंट टेबलमध्ये इंग्लंडचा मार्ग खडतर झाला असता आणि पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा आशा वाढण्याच्या शक्यता होत्या. परंतु, इंग्लंडने सामना जिंकल्याने पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे.

भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला. भारतानं सलग 5 सामन्यात विजय मिळवलेल्या विराटसेनेला इंग्लंडनं ब्रेक लावला. त्यामुळं इंग्लंडने सेमीफायनलच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. मात्र, भारताच्या विजयावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे पाकिस्तानसाठी भारतीय संघ जिंकणे महत्वाचे होते.

इंग्लंड संघाने केलेला भारतीय संघाचा पराभव पाकिस्तानी चाहत्यांना सहन होत नसल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे. याआधी पाकच्या चाहत्यांनी विराटसेनेला ऑक्सरला द्या, अशी टीका केली होती. आता यामध्ये पाकिस्तानच्या माजी खेळाडूंची देखील भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूस यानं भारतीय संघावर टीका केली आहे. युनूसनं इंग्लंडनं विराटसेनेला पराभवाचा दणका दिल्यानंतर भारताच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

पाकिस्तानचा पूर्व प्रशिक्षक आणि कर्णधार वकार यूनुसनं ट्विटरवर भारतीय संघावर टीका करताना म्हटलं आहे की, “तुम्ही कोण आहात, हे महत्त्वाचे नसते. पण तुम्ही आयुष्यात काय करता, यावरून कळते की तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात. मला पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचेल की नाही याची चिंता नाही. पण एका चॅम्पियन संघाची परीक्षा होती पण त्यात सफल झाले नाहीत.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)